…तर शिवसेना युती तोडेल; रामदास कदमांचा इशारा

0
740

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद विभागून घेण्याची अट शिवसेनेने भाजपसमोर ठेवली आहे.  ही अट मान्य न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा इशारा  शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.

कदम म्हणाले की, युती करण्यापूर्वी अडीच-अडीच वर्ष शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावे, अशी अट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवली होती, भाजपने अट मान्य केल्यानंतरच युती झाली, असेही कदम यांनी  यावेळी सांगितले.

विधानसभेला ज्यांच्या जास्त जागा येतील, त्यांचा मुख्यमंत्री येईल,  असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.  मात्र, हे चुकीचे आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी  चर्चा  करुन  विधान करावे. नाहीतर  उलटसुलट बोलल्यामुळे पुन्हा युती तुटायची’ असे कदम म्हणाले.