Maharashtra

“…तर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकबाहेर मी स्वत: जाऊन ढोल वाजवणार”

By PCB Author

September 25, 2020

पंढरपूर,दि.२५(पीसीबी) – भाजपा आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वाखाली पंढरपुरात ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आलं. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पडळकरांनी दिला आहे.

“आता तुम्ही जागे व्हा. आज धनगर समाज शांततेने आंदोलन करत आहे. जर त्यांच्या भावनांचा विचार केला गेला नाही, काही निर्णय झाला नाही तर मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आंदोलन करु. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकबाहेर मी स्वत: जाऊन ढोल वाजवणार” असं पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान राज्य सरकारचा गैरसमज दूर केला आहे. धनगढ नावाची जमात अस्तित्वात नाही. जे आहे ते धनगर आहेत. त्यांना दाखला देण्यास सुरुवात करावी. सरकारने अध्यादेश काढून आरक्षण द्यावं आणि केंद्राला यासंबंधी माहिती द्यावी असंही ते म्हणाले आहेत.