…तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार – बाळासाहेब थोरात

0
457

अहमदनगर, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तर पक्ष सांगेल तर मी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

थोरात म्हणाले की, राधाकृष्ण विखे-पाटील आपल्या घरातूनच पक्षाविरोधात बंड थोपवू शकले नाहीत.  चिरंजीव सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतरही राजीनामा न देण्याची भूमिका विखे-पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे पक्षातूनच त्यांच्या निष्ठेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

काँग्रेसने विखे-पाटील कुटुंबाला भरभरून दिले आहे. बाळासाहेब विखेंना खासदार, राधाकृष्ण विखेंना मंत्री, विरोधीपक्ष नेते, शालिनीताई विखे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केले. त्यामुळे सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला नको होता. या निर्णयाचा राधाकृष्ण विखे यांनी पहिल्यांदा निषेध करायला पाहिजे होता, असे थोरात म्हणाले.