…तर विराट कोहलीचा  पंतप्रधानपदासाठी विचार करावा लागेल – शरद पवार

0
1653

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) – पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर माजी क्रिकेटपटू इम्रान खान पंतप्रधानपदावर विराजमान होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. याबाबत आज (शनिवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पंतप्रधानपदावरुन  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना छेडले असता पवार मिष्कीलपणे  म्हणाले की, भारताचा कर्णधार  विराट कोहलीचा या पदासाठी विचार करावा लागेल.  यावर उपस्थितांमध्ये एकच  हस्यकल्लोळ उडाला.

इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या नात्याने तुम्हाला पंतप्रधान होण्यासाठी आवडेल का असा प्रश्न विचारला असता पवारांनी,  लोकसभा निवडणुका आता जवळ येत आहेत, पाहूया काय होतंय. भारतात या पदासाठी कदाचित विराट कोहलीचा विचार करावा लागेल, असे मिश्किल उत्तर दिले. देशाचा आणि जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष या नात्याने इम्रान खानशी आपले संबंध आले आहेत. मात्र, राजकारणी म्हणून मी इम्रान खानला कधीही भेटलेलो नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान,  मराठा समाजाला आरक्षण  मिळवून  देण्यासाठी घटनेत दुरूस्ती करता येणे शक्य आहे. याबाबतचा  निर्णय जर केंद्र सरकारने घेतला, तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी ग्वाही  पवार यांनी  दिली. घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते,  असेही पवार म्हणाले.