Desh

…तर राम मंदिराचा प्रश्न चोवीस तासात सोडवू – योगी आदित्यनाथ   

By PCB Author

January 27, 2019

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – अयोध्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही, तर उत्तर प्रदेश सरकार चोवीस तासात हा प्रश्न निकाली काढेल. राम मंदिर प्रश्नात नेमके काय करायचे हे न्यायालयाला ठरवता येत नसेल, तर आम्ही चोवीस तासात हा प्रश्न सोडवू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीवरील शोमध्ये  ते बोलत होते. न्यायालयाने राम मंदिराचा प्रश्न निकाली काढावा. त्यांना काय करावे, हे सुचत नसेल तर आमच्या हाती हा प्रश्न द्यावा आम्ही चोवीस तासात राम मंदिराचा प्रश्न निकाली काढू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

राम मंदिर प्रश्नी २९ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राम मंदिराची मागणी देशभरासह उत्तर प्रदेशातील साधू संतांनी केली आहे. शिवसेनेनेही राम मंदिर प्रश्नी आवाज उठवला आहे. शिवसेनेसह अनेक पक्षांनी आणि साधू संतांनी राम मंदिर प्रश्नी अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयाच्या निकालानंतर अध्यादेश काढण्याचे ठरवू, असे म्हटले आहे.