…तर मोदी तिहार जेलमध्ये असतील – पृथ्वीराज चव्हाण

0
507

पुणे, दि. १७ (पीसीबी) – सत्ताधारी भाजपकडून राफेल खरेदीमध्ये हजारो कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशी आम्ही मागणी करीत आहोत. जर या प्रकरणाची चौकशी झाल्यास मोदी हे पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर नसतील. तर ते तिहार जेलमध्ये असतील. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर सडकून टीका केली.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मागील निवडणुकीत भ्रष्ट्राचार मुक्त कारभार केला जाणार अशी घोषणा देऊन सत्ता हाती घेतली. पण पाच वर्षात अनेक प्रकल्प, योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळे झाले आहेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची भूमिका किंवा मंत्र्यावर कारवाई केली गेली नाही. असा पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार असतो का अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, सत्तेमध्ये येण्यापूर्वी शेतकर्‍यांच्या मालास चांगला बाजार भाव देऊ असे जाहीर केले. पण पाच वर्षात शेती मालास भाव तर दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहे. अशा शब्दात पंतप्रधानावावर त्यांनी निशाणा साधला.

वंचित आघाडीमुळे मतांचे विभाजन

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत जागा वाटपा बाबत चर्चा देखील झाली होती. त्यांना आम्ही सहा जागा विषयी बोलणी झाली होती मात्र मात्र ते बारा जागा मागत होते आणि त्यानंतर काय झाले तुम्ही पाहत आहात. तर वंचित आघाडीने सगळीकडे उमेदवार उभे केले आहे. या माध्यमातुन मतांचे विभाजन होणार असून यातून भाजप आणि वंचित आघाडीचे काय ठरले आहे. असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.