Maharashtra

…तर मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडे एकमेव पर्याय – प्रितम मुंडे

By PCB Author

October 15, 2019

बीड, दि. १५ (पीसीबी) – महाराष्ट्रात एखाद्या महिलेची मुख्यमंत्रिपदी निवड करायचे ठरले, तर भाजपसमोर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या एकमेव पर्याय आहेत, असे सुचक विधान भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी केले आहे.  

बीडमध्ये खासदार प्रीतम मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांना पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली, तर तुम्हाला आवडेल का ? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नक्कीत आवडेल, असे सांगून पंकजा मुंडे याच मुख्यमंत्रीपदासाठी पर्याय असतील, असे सांगितले.

दरम्यान,  सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे  मुख्यमंत्री,अशा घोषणा दिल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांना  शांत करताना मुख्यमंत्र्यांच्या शर्यत आताही नाही आणि २०१४ मध्ये ही नव्हते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले होते.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.  परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी दोन वेळा विजयी मिळवला आहे. आता त्या हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहेत.