…तर मी दुसऱ्या क्षणाला राजीनामा देईल – अमोल कोल्हे

0
1210

इंदापूर, दि. २७ (पीसीबी) – इंदापूरचे तिकीट कोणाला द्यायचे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठरवतील. मी केवळ  राष्ट्रवादी  पक्षातील एक मावळा आहे. जर, पवारसाहेबांनी सांगितले,  तर मी दुसऱ्या क्षणाला राजीनामा देईल असे, असे खासदार  अमोल कोल्हे यांनी  म्हटले  आहे.

राष्ट्रवादीची  शिवस्वराज्य यात्रा आज (मंगळवार)  इंदापूर येथे आली. यावेळी अमोल कोल्हे यांच्या भाषणावेळी एकाने विद्यमान आमदार  दत्ता भारणे यांचे तिकीट फिक्स करा,  अशी मागणी केली. यावर अमोल कोल्हे यांनी  उत्तर दिले.

अमोल कोल्हे म्हणाले की, मी तिकीट फिक्स करणारा कोणी नाही. मी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आहे. खासदारकीचा सत्तेचा मला मोह नाही. उद्या पवार साहेबांनी राजीनामा दे, असे सांगितले. तर दुसऱ्या क्षणाला मी खासदारकीचा राजीनामा देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या विधानसभेला भाजप शिवसेना पुन्हा नाही, तर यंदा शिवस्वराज्य येणार आहे, असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.