…तर मराठा आरक्षणाचा अहवाल पटलावर ठेवू नका – अजित पवार

0
645

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी  केली जात आहे. तर  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अजित पवार यांनी हा अहवाल पटलावर ठेवू नये, अशी भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. हा अहवाल पटलावर ठेवल्यास घटनात्मक पेच निर्माण होत असेल, तर तो पटलावर ठेवू नका, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

तर विधानसभेतील २८८ आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, मात्र, ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, अशी मागणीही  पवार यांनी केली आहे. ओबीसी समाजाने स्वतंत्र कोट्यातून  मराठा आरक्षण देण्याबाबत  शंका उपस्थित केली आहे. आघाडी सरकारने आरक्षण दिले, तर ते न्यायालयात   टिकू शकले  नाही. त्यामुळे किमान तुमचे तरी आरक्षण टाकावे, अशी आमची  इच्छा आहे. आम्हाला आरक्षणावर राजकारण करायचे नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण मिळू नये, असेही काही लोकांना मनातून वाटत आहे.  मात्र, मी त्यांची  नाव आता घेऊ शकत  नाही. आऱक्षणाबाबत विरोधकांचेही  एकमत आहे. आरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून आणि ५२ टक्क्यांना धक्का न लावता  दिले जावे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.