…तर मग प्रसाद दिल्याशिवाय परत पाठवणार नाही; नितेश राणेंचा इशारा

0
1411

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पग्रस्तांना समजावण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली मतपरिवर्तन समिती कोकणात आल्यास त्यांना ‘प्रसाद’ देऊ, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

नाणारसाठी कुठल्याही समितीने आमच्या देवगड विजयदुर्ग येथे पाऊल टाकले, तर जे काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही. आम्हाला चर्च नको, नाणार रद्दच करा, असे जनतेने सांगितले आहे. मग ही समिती भजन करायला येणार आहे का? आणि ही समिती आलीच, तर मग ‘प्रसाद’ दिल्याशिवाय परत पाठवणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, नाणार प्रकल्पासाठी सरकारकडून एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. माजी सचिव सुखथनकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती  स्थानिक  लोकांचे  मतपरिवर्तन  करून  प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगणार आहे. आता या समितीला लक्ष्य करण्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.