…तर भाजप – मनसे एकत्र येण्यास काहीच अडचण नाही; भाजपकडून युतीचे संकेत

0
353

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – पक्ष स्थापन झाल्यानंतर १३ वर्षांनंतर राज ठाकरे यांनी पक्षाचे अधिवेशन घेण्याचे निश्चित केले आणि मनसेचा बहुरंगी झेंडाही त्यांनी बदलला. तसेच या अधिवेशनामध्ये त्यांनी पुत्र अमित ठाकरे यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश घडवून आणला तर पक्षाचा झेंडाही बदलला.

पार्श्वभूमीवर मनसेचा झेंडा भगवा होताच भाजपकडून युतीचे संकेत आले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप-मनसे या संभाव्य युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुंबई येथे पत्रकारांनी मनसेच्या अधिवेशनाबाबत आणि मनसेच्या नवीन झेंड्याबाबत मुनगंटीवार यांना विचारलं असता त्यांनी युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली.बोलताना ते म्हणाले, ‘विचारात समानता असेल, तर युती होण्याची शक्यता बळावते. मनसेने देशहित आणि राष्ट्रहिताचे धोरण स्वीकारले, तर आम्हाला एकत्र येण्यास काहीच अडचण येणार नाही,’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा ध्वज बदलून भगवा रंग धारण करताच भारतीय जनता पक्षाने मनसेबरोबर आगामी काळात युती होऊ शकते, असे मुनगंटीवार यांनी दिले आहेत. शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने जात असेल, तर मनसे आणि भाजप सत्यासाठी एकत्र का येऊ शकत नाहीत? असा सवाल उपस्थित करत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला व भाजप-मनसे संभाव्य युतीचे संकेत दिले.