…तर पेट्रोल-डिझेलची ३५ ते ४० रुपयांनी  विक्री करु शकतो – रामदेवबाबा

0
426

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) –  केंद्र सरकारने मला परवानगी दिली, तर मी पेट्रोल-डिझलेची ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले  आहे. सरकारने मला परवानगी देऊन  करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली, तर मी पेट्रोल-डिझेल स्वस्त  दराने विकू शकतो, असे रामदेव म्हणाले.