…तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरु दिला नसता – खासदार उदयनराजे

0
605

सातारा, दि. १४ (पीसीबी) – सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार निधीतून २५ कोटी २६ लाखांची निधी विकास कामांसाठी खर्च केला आहे. त्याचा पुरावा  मी  दिला आहे.  माझी दहशत असती, तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरु दिला नसता, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे उमेदवार  नरेंद्र पाटील यांना लगावला.

उदयनराजे आपल्या प्रचारार्थ  आयोजित सभेत बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील,  हिंदूराव पाटील,  सत्यजितसिंह पाटणकर, संतोष कुंभार, धनंजय ताटे  आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, विरोधकांनी प्रचारासाठी ९० छोटे हत्ती आणले आहेत.  हे हत्ती कधी बाहेर काढतायेत याकडे  माझे लक्ष आहे.  बघू या मिशीवर किती पीळ मारतायत.स्वतः आमदार असताना माझ्या निधीतून गावात विकासकाम केली आहेत.  किती वाहने आणायची, खर्च किती करायचा याचा काही अजेंडा त्यांच्याकडे नाही, त्यामुळे ते माझ्या योग्यतेचे नाहीत, केवळ बेताल  विधाने करत असल्याची टीका उद्यनराजे यांनी केली.