Maharashtra

…तर तुमचा पंगा आमच्याशी आहे; चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना इशारा  

By PCB Author

August 11, 2019

सांगली, दि. ११ (पीसीबी) –  हे नाहीये… ते नाहीये… असे म्हणून तुम्ही लोकांना पॅनिक करत आहे. तुमचा पंगा आमच्याशी आहे. तुम्हाला वाटत आहे की, संधी मिळाली आहे, तर ठोका यांना… पण २ महिन्यांवर निवडणूक आहे तेव्हा बघूया… अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दम भरला आहे.

विरोधी पक्षाने  शासन आणि प्रशासनाच्या हातात हात घालून सांगायला पाहिजे की नेमके आणखी काय हवे आहे. त्याऐवजी हे नाही केले… ते नाही केले… असे म्हणत जर नुसत्या चुका काढल्या तर लोकांच्यात भितीचे वातावरण तयार होईल, असे पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले की, यंदा जवळजवळ बारापट जास्त पाऊस पडला आहे.  १९८९  सालचा कोल्हापुरातील पाऊस सर्वांत मोठा समजला जातो. त्यामुळे अशावेळी कितीही यंत्रणा आणली, तरी ती अपुरीच पडणार. मात्र आम्ही आमच्या परीने सर्वोतपरी प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सांगली-कोल्हापूरातील  पूरपरिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी  ४८ ते ७२ तास लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.