…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपमध्ये असते – सरकारी अधिकाऱ्याचे विधान  

0
897

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दलितांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही सरकारने दलित समाजासाठी इतके काम केले नव्हते.  केंद्राने चालू आर्थिक वर्षात दलित समाजासाठीच्या योजनांसाठी तब्बल १३८ कोटी रुपये दिले आहेत, असा दावा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज जिवंत असते तर ते भाजपमध्ये असते, असे विधान उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी लालजी प्रसाद निर्मल यांनी केले आहे.

उत्तर प्रदेश अनुसूचित जाती वित्त विभागाचे प्रमुख लालजी प्रसाद निर्मल एका कार्यक्रमात  बोलत होते. यावेळी ते बोलत होते.  सध्याच्या सरकारचे काम बघून आंबेडकरांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असता, असे त्यांना म्हणायचे होते.

दरम्यान, निर्मल यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे दलितांचे राम आहेत, असे म्हटले होते. तर एप्रिल महिन्यात त्यांनी योगी आदित्यनाथ यांना आंबेडकर महासभेच्या वतीने दिला जाणार  दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. निर्मल हे आंबेडकर महासभेचेही प्रमुख आहेत. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्याकडे उत्तर प्रदेश अनुसूचित जाती वित्त आणि विकास मंडळाच्या प्रमुखपदाची  जबाबदारी सोपवली होती.