…तर खासदार उद्यनराजेंच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार असेल – दिवाकर रावते

0
1206

सातारा, दि. ११ (पीसीबी) – साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जर लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवल्यास त्यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार उभा करणार  नाही.  त्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. मात्र, जर ते राष्ट्रवादीकडून उभे राहिल्यास  त्यांच्या विरोधात नक्कीच शिवसेना उमेदवार देईल, असे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले आहे. 

उदयनराजे यांना  पुन्हा  खासदार होण्यास शिवसेनेची हरकत  नाही.  मात्र, त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार होण्यास  शिवसेनाचा विरोध आहे, असे  दिवाकर रावते यांनी म्हटले आहे. यावर आता उदयनराजे कोणती प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजे यांची सातारा  मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व ठेवले आहे. त्यामुळे त्यांना अनेक पक्षांकडून निवडणूक लढवण्याबाबत विचारणा होत असते. काही दिवसांपासून उद्यनराजे यांची भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता तर त्यांना शिवसेनेनेही लोकसभा लढवण्याबाबत हालचाली सुरू केल्याचे रावते यांच्या विधानावरून दिसून येत आहे.