…तर काश्मीर आपल्या हातातून जाईल -दिग्विजय सिंह

0
712

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – काश्मीरची समस्या लवकर सोडवली नाही, तर काश्मीर आपल्या हातातून जाईल, अशी भीती  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे. ते  सिहोर दौऱ्यावर असून  त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना याबाबत आवाहन केले आहे.

कलम ३७०  हटवले, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. आता काश्मीर जळत आहे. मोदी यांनीही आपल्या हातात आता जळता निखारा घेतला आहे.  काश्मीरला वाचवणे आपले कर्तव्य आहे, असेही सिंह म्हणाले. जम्मू काश्मीरमधील कलम ३७०  हटवण्याच्या निर्णयाला दिग्विजय सिंह यांनी संसदेतही विरोध केला होता.

दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना ‘गुन्हेगार’असे  म्हटले आहे. याचाही सिंह यांनी खरपूस समाचार घेतला.  शिवराजसिंह चौहान जवाहरलाल नेहरु यांच्या पायाची धूळही नाहीत. चौहान यांना लाज वाटायला हवी होती,’ असे शब्दांत त्यांनी फटकारले.