…तर कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? पार्थ पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

0
1637

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरु आहे. यावर पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली, तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा प्रश्न  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या तयारीसाठी मुंबईत आज (शनिवार) राष्ट्रवादी काँग्रेसची  बैठक सुरू आहे. यावेळी पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी पार्थने निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांनी     अनुकूलता दर्शवली नाही. तर  शरद पवारांच्या  या प्रतिक्रियेवर अजित पवारांनी  या बैठकीत सूचक मौन बाळगणे पसंत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान,  मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची चर्चा करु नका, असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते. यामुळे पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.