Desh

…तर काँग्रेस संपलीच पाहिजे – योगेंद्र यादव  

By PCB Author

May 20, 2019

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखता येत नसेल,  तर काँग्रेस संपलीच पाहिजे, असे मत  समाजसेवक आणि निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. भारताच्या इतिहासात काँग्रेसची सकारात्मक भूमिका नव्हती. आज अन्य पर्याय निर्माण होण्यामध्ये काँग्रेसचा सर्वात मोठा अडथळा आहे, असेही योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

यादव पुढे म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन  होईल.  भाजपची एकहाती सत्ता येण्याचीदेखील शक्यता आहे. तसेच एनडीएला  बहुमताच्या जवळ पोहोचता येईल, परंतु पूर्ण बहुमत नाही मिळाले,  तर इतर (अपक्ष आणि लहान-मोठे पक्ष)पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचीदेखील शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एनडीएला बहुमतापेक्षा खूप कमी जागा मिळणे आणि एनडीएव्यतिरिक्त पक्षांचा पाठिंबा घेऊन मोदीवगळता नेता (भाजपमधील नेता अथवा इतर पक्षातील नेता)भारताचा पंतप्रधान होण्याची शक्यता  नाही. तसेच युपीए (काँग्रेस आणि मित्रपक्ष) आणि महाआघाडी मिळून सत्ता स्थापन करणे अशक्यच आहे, असेही  यादव  यांनी म्हटले आहे.