Maharashtra

तर कपडे फाडू; संदीप क्षीरसागरांचा मंत्री जयदत्त क्षीरसागरांना इशारा

By PCB Author

August 26, 2019

बीड, दि. २६ (पीसीबी) – सामाजिक व्यासपीठावर भाषणे केली, तर कपडे फाडू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी  काका राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना दिला आहे.  मंत्रीपद घेण्यासाठी ५० कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रेनिमित्त्  सभा  बीडमध्ये झाली. त्यावेळी  संदीप क्षीरसागर बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की,  बीड शहरातील अनेक जमिनी दोन्ही भावांनी हडप केल्या. संस्था, दारु दुकान आणि रॉकेलचे लायसन्स यांच्याच नावावर आहे,  असाही गंभीर आरोप  संदीप क्षीरसागर यांनी केला.

आमच्या नावावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचा काकांचा दावा धादांत खोटा आहे. त्यांच्यासमोर आपण खुल्या व्यासपीठार कधीही वन – टू – वन यायला तयार आहे. तशी वेळ आली, तर त्यांचे कपडे फाडू, असा इशारा त्यांनी दिला.