…तर एसबीआयची नेट बँकिग सेवा बंद होणार

0
700

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) –  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंटरनेट बँकिग वापरणाऱ्या खातेदारांना १ डिसेंबरपर्यंत आपला मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावा लागणार आहे. अन्यथा खातेदारांना नेट बँकिंग सेवा वापरता येणार नाही. 

याबाबत बँकेने ‘ऑनलाइनसेबी’ या आपल्या संकेसस्थळावर ग्राहकांना माहिती दिली आहे. १ डिसेंबर २०१८ पर्यत खातेदारांनी  बँक खात्याशी मोबाइल क्रमांक जोडला नाही, तर १ डिसेंबर २०१८ नंतर खातेदारांची इंटरनेट बँकिंग सुविधा रद्द करण्यात येणार आहे.

दरम्यान, आपल्या ग्राहकांना एसएमएस आणि इमेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगा, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ जुलै २०१७ रोजी एका निवदनाद्वारे बँकांना दिले होते.