Maharashtra

…तर एसटी कर्मचारी दिवाळी गोडपणे साजरी करू देणार नाहीत – धनंजय मुंडे

By PCB Author

October 30, 2018

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना ४ हजार८४९ रूपयांची  पगारवाढ अद्यापही मिळालेली नाही. परिवहन मंत्र्यांची पगारवाढीची  घोषणा फसवी आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास कर्मचारी सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना दिवाळी गोडपणे साजरी करू देणार नाहीत, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.  

आझाद मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या उपोषणाला  मुंडे यांनी भेट दिली.  यावेळी ते बोलत होते.

ज्या वेळी सरकार ऐतिहासिक शब्दांचा वापर करते . तेव्हा फसवणुक होणार असल्याचे निश्चित समजावे. ऐतिहासिक कर्जमाफी म्हणून केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली आहे.  त्याचप्रमाणे रावते यांची ऐतिहासिक पगारवाढीची घोषणाही फसवी निघाली आहे. यामुळे मी स्वतः कामगारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत  लढा देण्यास तयार असल्याचे मुंडे म्हणाले.