… तर एमआयएमला घरात घुसून मारू – उद्धव ठाकरे

0
601

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – औरंगाबाद महानगरपालिकेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेदरम्यान गोंधळ घातला होता. तर काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन केले होते. याच प्रकरणावरून शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून एमआयएमवर निशाणा साधला आहे. लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोल केला.

आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील, असेही त्यात सामनाच्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदनही करण्यात आले आहे. दरम्यान, एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच्या शहराच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला असून पुढे आता काय घडेल याची प्रचिती गुरूवारच्या प्रकारावरून दिसून येत असल्याची टीकाही त्यातून करण्यात आली आहे.