…तर आम्ही शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार; अर्जुन डांगळेंचा इशारा

0
871

मुंबई, दि. २० (पीसीबी) – आरपीआयचे अध्यक्ष व केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपची साथ धरल्याने आम्ही  शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही शिवसेनेसोबत राहिल्यामुळे शिवसेनेला  फायदा  झाला. दरम्यान, आगामी निवडणुकीमध्ये  शिवसेनेने भाजपसोबत युती केली. तर आम्ही शिवसेनेच्या विरोधात प्रचार  करू,  असा इशारा  ‘रिपब्लिकन जनशक्ती’ चे नेते अर्जुन डांगळे यांनी दिला. 

आतापर्यंत आम्ही  भाजपला विरोध  करत आलो आहोत. आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव व्हावा,   अशीच  आमची इच्छा आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसह  इतर समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे.  समविचारी  पक्ष वेगळे लढले, तर मताचे विभाजन  होऊन  पुन्हा एकदा भाजपला सत्ता मिळेल.  त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पुरोगामी लोकांनी  एकत्र येण्याची  गरज आहे, असेही डांगळे म्हणाले.

गेल्या वेळी शिवसेना भाजपच्या विरोधात उभी राहत  असल्याने आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान,  आगामी निवडणुकीसाठी  शिवसेना – भाजप यांची  युती झाली.  तर  शिवसेनेच्या विरोधात जाऊन प्रचार करण्याचा इशारा  डांगळे यांनी यावेळी दिला.