Desh

तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना अटक

By PCB Author

June 24, 2019

दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – दोघा सख्ख्या भावांनी एका २२ वर्षीय तरुणीवर सलग चार दिवस बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नवी दिल्लीतील अमर कॉलनीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे आपल्या कुटुंबाशी भांडण झाल्याने १६ जून रोजी कानपूरहून दिल्लीला आली होती. निझामुद्दीन रेल्वे स्थानकावर एक दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी नोकरी शोधण्यासाठी ती लाजपत नगर येथे गेली होती. लाजपत नगर येथे एका चहावाल्याने तिला घरकाम देण्याचे आश्वासन दिले. तिला चहाच्या टपरीवरही काम करण्यास सांगण्यात आले. संध्याकाळी चहावाल्याची दोन्ही मुले तेथे आली आणि पीडित तरुणीला आपल्यासोबत घेऊन गेले. दोघांनीही सलग चार दिवस तरुणीवर बलात्कार केला. एके दिवशी दोघे भाऊ झोपले असताना पीडित तरुणीने पळ काढला आणि शेजाऱ्यांकडे मदत मागितली. ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली.