तरुणाईच्या जल्लोषात ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे बक्षिस वितरण

0
676

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) – भारत आगामी काळात सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून ओळखला जाईल. या तरुणाईला योग्य दिशा दाखविण्याची व मार्गदर्शनाची गरज आहे. तरुणांची हि ऊर्जा देशाच्या सर्वांगिण विकासासाठी महत्वपुर्ण योगदान देईल. परंतू शिक्षण, उद्योग व्यवसायाबरोबरच क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात देखील तरुणांना मार्गदर्शकाची गरज आहे. या क्षेत्रात करिअर करणा-यांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कर्तव्य फाऊंडेशन, मोरया युथ फेस्टिव्हलच्या माध्यमातून मार्गदर्शकाची भूमिका बजावेल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योजक व लायन्स क्लबचे महाराष्ट्र प्रांतपाल ओमप्रकाश पेठे यांनी व्यक्त केला.

कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या ‘मोरया युथ फेस्टिव्हल २०२०’ चा बक्षिस वितरण समारंभ गुरुवारी (दि.२३) चापेकर चिंचवड येथील गंधर्व हॉल येथे संपन्न झाला. यावेळी पेठे बोलत होते. यावेळी अॅड. पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्ञान प्रबोधिनीचे मनोज देवळेकर, नगरसेवक बाबू नायर, कामगार नेते इरफान सय्यद, ज्योतीका मलकानी, प्रा. शिल्पागौरी गणपुले, किरण येवलेकर, राजेश पाटील, चेतन फेंगसे, देवदत्ता कशाळीकर आणि बक्षिस विजेते विद्यार्थी उपस्थित होते. या फेस्टिव्हलमध्ये सलग दुस-या वर्षी सर्वात जास्त सत्ताविस बक्षिसे पटकाविणा-या पिंपरीतील डी.वाय. पाटील एसीएस कॉलेजने चॅम्पियन ट्रॉफी पटकाविली.

अॅड. सचिन पटवर्धन म्हणाल की, उद्योग नगरीतील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे. शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना संधी व प्रोत्साहन मिळाले पाहिजे या उद्देशाने ‘मोरया युथ फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. या स्पर्धातूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, कलाकार घडतील, असा विश्वास आहे असे ॲड. पटवर्धन म्हणाले. ११ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन करण्यात आले होते. या फेस्टिव्हल मध्ये शहरातील साठ महाविद्यालयातून ४००० हुन जास्त विद्यार्थ्यांनी कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुध्दिबळ, कॅरम, टेबल टेनिस, व्यंगचित्र, स्पॅाट पेंटिंग, भित्तीचित्र, मेहंदी, रांगोळी, गायन, नकला, रायफल शुटिंग, कथा लेखन, वक्तृत्व स्पर्धा, कथा कथन, गट चर्चा, मोबाईल फोटोग्राफी, नृत्य स्पर्धा, एकपात्री प्रयोग, शॉर्ट फिल्म, मीम, पथनाट्य, समुह नृत्य या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

स्पर्धेचा निकाल प्रथम, व्दितीय, तृतीय आणि चतृर्थ क्रमांक (महाविद्यालय) प्रमाणे – व्यंगचित्र :- आदित्य बनसोड (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), अस्मिता तिवारी (एमयुसीसी), संकेत मडगा (ॲलर्ड कॉलेज) ; स्पॉट मेकिंग :- श्रृती हुसे (एमयुसीसी), भूमिका मोदी (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), विशाखा पतंगे (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज); भित्तीचित्र :- विशाखा पतंगे (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), प्रगती खटावकर (एटीएसएस), भूमिका मोदी (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज) ; मेंहंदी :- कोमल मोहीते (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), राजेश्वरी वाघ (एटीएसएस), दिव्या कछा (एटीएसएस), प्रियांका सिंग (प्रतिभा कॉलेज) ; रांगोळी :- प्रियांका सिंग (प्रतिभा कॉलेज), श्रेया कांबळे (एस.बी.पाटील कॉलेज), समिक्षा पाटील (रामकृष्ण मारे कॉलेज), वैष्णवी गोसावी (डी.वाय.पाटील लॉ कॉलेज); गायन :- अभय सिंग वाघचौरे (एमयुसीसी), सोनिया कारभारी (डी.वाय.पाटील आयुर्वेदिक कॉलेज), अंजली वाघमारे (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), आदेश आनंद म्हाळसेकर (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज) ; नकला :- श्रेयस ओसवाल (लोकमान्य मेडिकल कॉलेज), अथर्व परब (सी.के. गोयल कॉलेज), प्रतिक कारळे (रामकृष्ण मोरे कॉलेज), मंदार कुलकर्णी (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज) ; टेबल टेनिस :- राधिका फोफलिया (डी.वाय.पाटील लॉ कॉलेज), किर्ती मान (पीसीसीओई), मल्हार तापकीर (सीटीप्राईड), प्रथमेश शिरगिरे (पीसीसीओई) ; कॅरम :- सर्वजीत बनसोडे (डी.वाय.पाटील लॉ कॉलेज), आयुश सोलंकी (एसएसएमआयबीएमआर), श्रेयस ओसवाल (लोकमान्य होमिओपॅथी), यश काकडे (एटीएसएस) ; बुध्दिबळ :- सुरभी शर्मा (एस.बी.पाटील कॉलेज), अमोल थोरात, दीप चव्हाण (महात्मा फुले कॉलेज) ; रायफल शुटिंग :- निखिल जाधव (रामकृष्ण मोरे कॉलेज), अफरीन आत्तार (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), अभिषेक गुप्ता (रामकृष्ण मोरे कॉलेज), प्रशांत क्षिरसागर (डी.वाय.पाटील लॉ कॉलेज) ; कथा लेखन :- स्वप्निल पिंगळे (अॅलर्ड कॉलेज), रेणुका सिंग (रामकृष्ण मोरे कॉलेज), इशा गोयल (डी.वाय.पाटील लॉ कॉलेज), विशाखा पतंगे (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), अंकिता गायकवाड (डी.वाय.पाटील आयुर्वेदिक कॉलेज) ; वक्तृत्व :- अभिषेक शुल्का (अॅलर्ड कॉलेज), कुणाल वाघ (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), संतोष गुजर सोळंकी (डी.वाय.पाटील आयुर्वेदिक कॉलेज), रिदा खान (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), रिया बनसोडे (रामकृष्ण मोरे कॉलेज) ; कथा कथन :- सिमा शेरकर (रामकृष्ण मोरे कॉलेज), प्रिती जोशी (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), विशाखा पतंगे (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज) ; गट चर्चा :- गायत्री चरंतीमठ – भाग्यश्री कांबळे (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), अनिकेत गायकवाड – कुणाल वाघ (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), अभिषेक शुक्ला – आशुतोष ठाकूर (ॲलर्ड कॉलेज) ; मोबाईल फोटोग्राफी :- अजय सुर्यवंशी (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज), कौशिक आटवे(रामकृष्ण मोरे कॉलेज), आदित्य गुप्ता (एटीएसएस), दिव्या वाडिकर; नृत्य :- स्नेहल कुलकर्णी (एएसएम – सीएसआयटी),  स्नेहल सिंग (डी.वाय.पाटील एसीएस कॉलेज),गणेश डोलार (एएसएम – आयबीएमआर) आदींनी बक्षिसे पटकाविली.