तपासात राष्ट्रवादीचे काही नेतेच उघड होतील याची त्यांना भिती – सुधीर मुनगंटीवर

0
634

मुंबई,दि.२५(पीसीबी) – भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी “भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेली दंगल कोणीतीरी स्पॉन्सर केली असं त्यावेळी म्हटलं जात होतं. आमचं सरकार असताना शिवसेनाही सोबत होती. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनीही यावर भाष्य केलं होतं. आता या तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते तपासात उघड होतील याची त्यांना भिती आहे,” अशी टीका केली आहे.

मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं की’ “एनआयए ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेवर शंका घेणं योग्य नाही. एनआयएवर शंका घेणं याचा अर्थ तुमच्या मनात भिती आहे. आपण एसआयटीची चौकशी लावायची आणि चार्ज फ्रेम होऊ द्यायचे नाही, अशी त्यांची इच्छा असावी. या प्रकरणाच्या तपासावर कोणतीही शंका उपस्थित करणं योग्य नाही,”

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच भीमा कोरेगाव प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. तसे पत्र पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. पवारांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारीच आढावा घेऊन तपास अधिकाऱ्यांकडे पुरावे मागितले होते.