तनुश्री दत्ताने माफी मागावी; नाना पाटेकरांनी पाठवली नोटीस

0
558

मुंबई, दि. १ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपाप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांनी कायदेशीर  नोटीस पाठवून माफी मागवी, अशी मागणी केली आहे, असे    नानांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. 

तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस  आज मिळेल. नाना पाटेकरांवरील आरोप नोटीसमधून फेटाळण्यात आले आहेत. तसेच त्यांची प्रतिमा मलिन केल्याने तनुश्री दत्ताने माफी मागावी, अशी मागणी  केल्याचे वकील शिरोडकर यांनी सांगितले.

याप्रकरणी फार काही बोलता येणार नाही. पण तनुश्री दत्ताने असे आरोप का केले याची काही कल्पना नाही. नाना पाटेकर लवकरच मुंबईत परतणार आहेत, असे शिरोडकर म्हणाले. मुंबईत आल्यानंतर नाना पाटेकर हे या प्रकरणी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.