तनुश्रीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल; नाना पाटेकरांना १० दिवसात म्हणणे मांडण्याचे आदेश

0
440

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – असभ्य वर्तन केल्याप्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेत नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे.

राज्य महिला आयोगाने नोटीस बजावून नाना पाटेकर यांच्यासह चौघांनाही १० दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवालही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सविस्तर माहितीसाठी तनुश्री दत्ता यांनी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला (सिन्टा) तत्काळ याप्रकरणी तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेशही राज्य महिला आयोगाने दिले आहेत.