तनुश्रीचा राखीवर अब्रूनुकसानीचा दावा; दहा कोटींची मागणी

0
1018

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo मोहीमेअंतर्गत अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक मोठ्या कलाकारांनी तनुश्री दत्ताला पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे तिला विरोध करणारेही काही कलाकार होते. त्यापैकी एक राखी सावंतही होती. आता तनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

तनुश्री ड्रग्ज घेऊन तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पडली होती. नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या सांगण्यावरुन मला तिचे गाणे करावे लागले होते. त्यामुळे तनुश्री दत्ताने राखीवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. सोबतच राखीकडे दहा कोटी रुपयांची मागणी केली आहे.

तनुश्रीवर भाष्य करतानाचा राखी सावंतची एक मुलाखत व्हायरल झाली होती. राखी म्हणाली होती की, “तनुने सिनेमातील गाणे अर्धवट सोडले होते. यानंतर कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचा मला कॉल आला. तू सेटवर ये, गाण करायचे आहे, एवढेच गणेशने सांगितले. मग मी तातडीने सेटवर पोहोचले.” या घटनेबद्दल सांगताना राखीने अनेकदा तनुश्रीसाठी अपशब्दांचा वापर केला होता.