तडीपार गुंड बजा वाघेरे पोलिसांच्या जाळ्यात

0
295

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) कुख्यात तडीपार गुंड बजा वाघेरे याला पोलिसांनी अटक केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. १७) ही कारवाई केली. बजा ऊर्फ बजरंग रमेश वाघेरे (वय ३०, रा. पिंपरीगाव) असे अटक केलेल्या कुख्यात तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बजा वाघेरे याला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आले आहे. त्याची तडीपारीची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपुष्टात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच तो पिंपरी चिंचवड शहरात आला असल्याची माहिती सहायक उपनिरीक्षक शाकीर जिनेडी आणि पोलीस कर्मचारी संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सापळा लावून बजा वाघेरे याला अटक केली.

कुख्यात गुंड बजा वाघेरे यांच्यावर चार खुनाचे तसेच खंडणी, मारहाण, तोडफोड असे जवळपास १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तडीपारीचा आदेश भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पिंपरी पोलिस करीत आहेत.

सदरची कामगिरी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले सहायक उपनिरीक्षक शाकीर जेनेडी, पोलीस कर्मचारी संदीप पाटील, प्रदीप शेलार, दिनकर भुजबळ, प्रसाद जंगलवाढ, संतोष दिघे, शैलेश मगर, संतोष भालेराव, अशोक गारगोटे यांच्या पथकाने केली