तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

0
328

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – तडीपार केलेल्या गुंडाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 2) रात्री साडेनऊ वाजता भोसरी गावात राजमाता कॉलेज शेजारील मंदिरासमोर करण्यात आली.

दत्ता एकनाथ लोणकर (वय 36, रा. लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रभाकर खाडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता लोणकर याला 31 मार्च 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने स्वतःजवळ हत्यार बाळगले. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी कोयता जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.