Pune

तडीपार कोंढाणपूर फाटा ब्रिज जवळ येणार असल्याचे समजताच, पोलिसांनी लावला सापळा…अटकेचा थरार

By PCB Author

July 21, 2021

पुणे,दि.२१(पीसीबी) – दि 20/7/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकास राजगड पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून 2 इसम एक काळ्या रंगाचे ऍक्टिवा गाडी वरून कोंढाणपूर फाटा ब्रिज जवळ येणार असल्याचे समजले त्यावरून त्या ठिकाणी सदर पथकाद्वारे सापळा रचून काळ्या रंगाच्या ऍक्टिवा गाडी वरून येणाऱ्या 2 इसमाना ताब्यात घेऊन त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे पुढील प्रमाणे –

१) रोहित विजय अवचरे (वय 24) वर्षे रा लक्ष्मी नगर शाहू वसाहत पर्वती पुणे 9 २) आदित्य सोपान साठे (वय 26) वर्षे रा जनता वसाहत पर्वती पायथा पुणे 9

असे सांगितले त्यांची अंग झडती घेतली असता वरील दोन्ही सराईत यांच्या कम्बरेला प्रत्येकी एक गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले तसेच त्यांचे कडील गाडीची डिकी चेक केली असता त्यामध्ये एक गावठी पिस्तुल असे एकूण 3 गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आले सदरच्या आरोपींची आणखीन माहिती घेतली असता आरोपी क्र १) रोहित विजय अवचरे हा पुणे जिल्ह्यातील तडीपार गुंड असून आज पर्यत त्याची तडीपार मुदत सम्पलेली नाही . सदरच्या सराईताकडून

१) गावठी पिस्तुल कीं रु 35,000 २) गावठी पिस्तुल कीं रु 35,000 ३) गावठी पिस्तुल कीं रु 35,000 ४) दोन जिवंत काडतुसे कीं रु 200 ५) एक काळ्या रंगाची ऍक्टिवा मोटार सायकल नो क्र एम एच 12 एम एन 2716 कीं रु 50,000

असा ऐकून 1 लाख 55 हजार 200 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई आणि तपास करणे करीत आरोपी मुद्देमाल सह राजगड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक सो डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते भोर उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे , पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर धोंडगे सा.फौ.दत्तात्रय जगताप, पो.हवा राजू मोमीन, पो.ना. चंद्रकांत जाधव , पो.शि.अमोल शेडगे, पो.शि.मंगेश भगत, पो.शि,धीरज जाधव, पो.शि.अक्षय नवले, म.पो.शि.पूनम गुंड, चा.पो.हवा.मुकुंद कदम, सदरची कारवाई केली आहे .