Pimpri

तडीपार केलेल्या आरोपीने पोलिसाला धक्काबुक्की करत पोलिसाचा शर्ट फाडला

By PCB Author

March 23, 2021

थेरगाव, दि. २३ (पीसीबी) – तडीपार केलेला आरोपी परवानगी घेतल्याशिवाय हद्दीत आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसासोबत आरोपीने धक्काबुक्की केली. तसेच पोलिसाचा शर्ट फाडला. हा प्रकार सोमवारी (दि. 22) दुपारी 16 नंबर, थेरगाव येथे घडला.  बबल्या उर्फ सागर बापू खताळ (वय 22, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक पी डी कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर खताळ याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2 जुलै 2019 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आला. शासनाची कोणतीही परवानगी घेतल्याशिवाय तो पिंपरी-चिंचवड शहरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी सागर 16 नंबर थेरगाव येथे थांबला असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक कदम यांच्यासोबत त्याने हुज्जत घातली. कदम यांना धक्काबुक्की करून त्यांचा शर्ट फाडला. फिर्यादी पोलीस नाईक कदम करत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. याबाबत त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.