तंबाखूयुक्त पदार्थांवरील निर्बंध कडक करा – जागतिक तंबाखू निषेध दिनी डेंटल असोसिएशनची मागणी

0
312

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या निमित्ताने इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकां मध्ये असोसिएशन च्या सदस्यांनी फिजिकल डिस्टनसिंग निकष पाळून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत फलक दाखवुन जनजागृती केली आणि शहरातील मुख्य चौकांत कार्यरत असणाऱ्या पोलीस, वाहतूक पोलीस यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे शहरातील तंबाखू, सिगरेट आणि तंबाखू युक्त पदार्थ विकणाऱ्या दुकाने बंद असल्यामुळे तंबाखू व्यसनाधीनता कमी झाली असावे असे वाटते. अशाच प्रकारे राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या शहरामध्ये काळ्याबाजाराने विकल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या तंबाखूयुक्त पदार्थांवरील निर्बंध कडक करावेत यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे यांनी केली.

डॉ. संदीप भिरुड ,आणि डॉ.सुमंत गरुड यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली आणि स्वतःच्या स्वतः तोंडातील मुखकर्करोगाच्या पूर्वलक्षणाबाबत तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.

तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने इंडियन डेंटल असोसिएशन च्या वतीने शहरातील मुख्य चौकात कार्यरत असणाऱ्या पोलीस,वाहतूक पोलीस यांना हँड सॅनिटायझर् आणि फेस मास्क यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष पिंगळे, डॉ दीपाली पाटेकर, डॉ.शिवाजी चव्हाण, डॉ.निखिल अगरवाल, डॉ.पूजा माने,डॉ.शलाका जाधव उपस्थित होते.