Maharashtra

तंत्रज्ञानचा वापर करून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचा शासनाचा प्रयत्न – सुभाष देसाई

By PCB Author

September 25, 2020

मुंबई,दि.२५(पीसीबी) – तंत्रज्ञानचा वापर करून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या ‘सीआयआय हॉस्पिटल टेक-२०२०’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राज्य सरकार कोव्हिड संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोव्हिड चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली. आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढवला आहे. येत्या काळात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांची चाचणी केली जाईल. प्रतिदिन सुमारे दीड लाख चाचण्या करण्याचा शासनाचा मानस आहे, असं देसाई म्हणाले.

दरम्यान नुकतेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम शासनाने सुरू केली आहे. त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नवीन तंत्रज्ञान नेहमीच उपयुक्त ठरते. त्याचा वापर करून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं देखील देसाई यांनी सांगितलं.