Maharashtra

ड्युटीवर असताना फोटो मागू शकत नाही,  तुमची तक्रार करेन; निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन

By PCB Author

October 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी)-  महाराष्ट्रासह हरयाणा विधानसभेसाठी सोमवारी मतदानपार पडले. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अभिनेत्री जया बच्चन यांनीही मतदान केले, पण मतदानानंतर मात्र त्या मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यावर चांगल्याच संतापल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

या वृत्तानुसार, मुंबईतील जुहूच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह जया बच्चन पोहोचल्या होत्या. मतदानानंतर जया बच्चन बाहेर येताच मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्याने जया यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. अधिकाऱ्याच्या फोटा काढण्याच्या मागणीवर जया बच्चन यांचा पारा चढला.

‘मी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले आहे. तुम्ही निवडणूक अधिकारी आहात. ड्युटीवर असताना तुम्ही अशाप्रकारे फोटो मागू शकत नाहीत. मी तुमची तक्रार करणार आहे,’ असे त्यांनी फोटो मागणाऱ्या त्या अधिकाऱ्याला सुनावले. यानंतर त्या माध्यमांवर देखील भडकलेल्या दिसल्या. उपस्थित कॅमेरामॅनला धक्का देत त्या आपल्या कारमध्ये जाऊन बसल्या.