डोळ्यावर मिरची पावडर टाकून पादचारी वृद्धाला लुटले

0
358

निगडी, दि. १ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या वृद्धाच्या तोंडावर मिरची पावडर टाकून लुटले. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी आकुर्डी-निगडी येथे घडली.

कवडू विठोबा थूल (वय 68, रा. धृवदर्शन हाऊसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थूल हे सोमवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास आकुर्डी येथील रेल्वे पुलाजवळ पायी चालत जात होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या तोंडावर मिरची पावडर टाकली. त्यानंतर थूल यांच्या गळ्यातील 15 हजार रुपये किमतीची ओम अक्षर लिहिलेली सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.