डोनाल्ड ट्रम्प यांना महाराष्ट्रात आणले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती – संजय राऊत

0
479

मुंबई,दि.२४(पीसीबी) – महाराष्ट्रामध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे शिवथाळी. सगळ्या जगाला या १० रुपयांच्या शिवथाळीचं आश्चर्य वाटत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना राज्यात आणले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद ऐवजी मुंबईला आले असते तर त्यांनी पहिली गोष्ट शिवथाळीच्या स्टॉलवर जाण्याची केली असती, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सुरुवातीला ते अहमदाबादला जाणार आहेत. त्यानंतर ते ताजमहल पाहण्यासाठी आग्रा येथे जाणार आहेत.