Entertainment

‘डोंबिवली फास्ट’चे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती खराब

By PCB Author

August 12, 2020

हैदराबाद,दि.१२ (पीसीबी) : बॉलिवूडचे मराठी रांगडे दिग्दर्शक निशीकांत कामत यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारण, निशीकांत कामत यांची तब्येत अचानक बिघडली आहे. निशीकांत यांच्यावर हैदराबादमधील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

काही दिवसांपासून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. कारण काही दिवसांपासून त्यांना यकृताचा आजार असल्याचं समोर आलं होत. या आजाराला ‘लिव्हर सिरोसिस’च असं म्हणतात. त्यांना यकृताचा त्रास पुन्हा होऊ लागला होता. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

निशीकांत यांनी अनेक चित्रपटांमधून आपला ठसा उमटवला होता. ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यांच्या मराठी ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलय. त्यानंतर, त्यांनी मदारी,दृष्यम, मुंबई मेरी जान, असे अनेक हिंदी चित्रपट करून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. शिवाय त्यांनी जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात खलनायकाची भूमिका उत्तम सादर केली.