डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या ‘साईजीवन हॉस्पिटल’ च्या नवीन वास्तूचे उदघाटन

0
170

सोमाटणे,दि.१८(पीसीबी) – सोमाटने फाटा तालुका मावळ पुणे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर महेंद्र चव्हाण यांचे लहान मुलांचे साई जीवन हॉस्पिटल हे दिनांक १७ जानेवारी २०२० रोजी नवीन वास्तूत स्थलांतरित झाले.

या नवीन वास्तूच्या उदघाटन प्रसंगी डॉ. महेंद्र चव्हाण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती आणि जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नगरसेविका सीमा सावळे आणि बांधकाम व असंघटित कामगार संघ अध्यक्ष सारंग कामतेकर हे उपस्तिथ होते.

२०१२ साला पासून डॉ. चव्हाण हे सोमाटणे फाटा येथे स्वतःचे खाजगी रुग्णालय सुरु करून आपली सेवा पुरवीत आहे. तसेच या हॉस्पिटल मध्ये सुसज्ज स्वतंत्र बालरोग विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, तसेच स्वतंत्र एक्स रे विभाग आहेत अशी माहिती डॉ. महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.