Maharashtra

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार”

By PCB Author

December 06, 2019

महाराष्ट्र, दि.६ (पीसीबी) – शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळमधील बीआयटी चाळीला भेट दिली. बीआयटी चाळ येथील एका इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनेक वर्षे वास्तव्यास होते. या घरालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३ वा महापरिनिर्माण दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शुक्रवारी मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली. १९१२ ते १९३४ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी वास्तव्यास होते. यापूर्वी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. आंबेडकर यां निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.

डॉ.#बाबासाहेबआंबेडकर हे परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसर्‍या माळ्यावर राहायचे. २२ वर्षे येथे त्यांचे वास्तव्य होते. हे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी या चाळीला दिली भेट.#महापरिनिर्वाणदिवस pic.twitter.com/qIeNSUHjk7

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2019

आ. @Awhadspeaks यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या इमारती मध्ये राहत होते ज्या खोलीमध्ये त्याचे बालपण गेले तेथे जाऊन भेट दिली.
बी.आय.डी चाळीचे रूपांतर भव्य राष्ट्रीय स्मारकात व्हावे ही मागणी मा.मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याकडे आव्हाड यांनी केली आहे@Jayant_R_Patil @CMOMaharashtra pic.twitter.com/Z64SncK1wM

— NCP Thane (@ThaneNCP) December 5, 2019