Pimpri

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गंत कारवाई करा – भीम आर्मी

By PCB Author

June 03, 2019

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) –  मुंबईतील नायर हॉस्पीटलमधील डॉ. पायल त़डवी यांचा जातीवाचक उल्लेख करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या तीन महिला डॉक्टरवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गंत योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भीम आर्मीचे अध्यक्ष अंतिम जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी नायर हॉस्पीटलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच पायल तडवी यांची बाजू मांडण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याचा सखोल अभ्यास असणाऱ्या वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनावेळी भीम आर्मीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाई पोळ, एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते धम्मराज साळवे, रयत विद्यार्थी विचार मंचाचे संतोष शिंदे, अभिजित गायकवाड, गौतम कोटे, उपाध्यक्ष सुमित वाघमारे, संघटक नितीन सरवदे, वैभव सावंत, भैयासाहेब गजधने, सुखदेव कुचेकर, अजय भंडारे, गौरव बनसोडे, राजकुमार कांबळे, देवानंद दुपरगुडे, आकाश शिंदे, दत्ता वाघमारे, सविता सरवदे, शालन जाधव, गायत्री गायकवाड, प्रियांका सरवदे, शिवनाथ दिलपक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.