डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला – सुशीलकुमार शिंदे

0
453

सोलापूर, दि. २९ (पीसीबी) – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. परंतु  मारेकऱ्यांचा शोध लागला नाही, अशी खंत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

एका कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले,  की डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध आम्ही घ्यायचा खूप प्रयत्न केला. परंतु शोध लावण्यात यश आले नाही. अशा समाज विघातकांचा बंदोबस्त मन परिवर्तनातून होणे आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले.

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर  म्हणाले की, आताच्या परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा मार्ग स्वामी विवेकानंद, संत तुकाराम महाराज व डॉ. निर्मलकुमार फडकुले या तिघांच्या विचारातून मिळतो. धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करण्यासाठी धर्माचा आधार घ्यावा लागेल. स्वामी विवेकानंद यांचे मर्यादित विचार समाजापुढे आणण्यात आले आहेत. आजच्या स्थितीत स्वामी विवेकानंद यांचे जातीबद्दलचे व धर्माबद्दलचे विचार उपयुक्त आहेत.