डॉ. डी. वाय.पाटील विद्याप्रतिष्ठान महापालिकेच्या जागेवर बांधणार इमारत

0
354

पिंपरी, दि.०६ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सेक्टर नंबर 27 निगडी येथील आय टी आयची इमारत पाडून त्या जागी डॉ. डी.वाय.पाटील विद्याप्रतिष्ठान नवीन इमारत बांधणार आहे. महापालिका ही इमारत डी.वाय.पाटील प्रतिष्ठानला 30 वर्षे नाममात्र दराने देणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सेक्टर नंबर 27 अ, निगडी येथे इमारत आहे. आय टी आयसाठी ही इमारत वापरली होती. डॉ. डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटी पूर्वीचे नाव (डॉ.डी.वाय.पाटील विद्याप्रतिष्ठान सोसायटी) ही संस्था शहराच्या हद्दीत ज्ञानदानाचे कार्य करत आहे. संस्थेला ज्ञानदानाच्या कार्यासाठी जागेची आनश्यक होती. त्यासाठी महापालिकेने आय टी आयची इमारत 30 वर्षासाठी या संस्थेला भाडेकराराने दिली होती.

इमारत फार जुनी झाली असून मोडकळीस आली आहे. त्यामुळे आय टी आय इमारत भाडेकराराने न देता आहे, त्या जागेवर डॉ.डी.वाय.पाटील विद्याप्रतिष्ठान सोसायटी ही संस्था नवीन इमारत उभी करणार आहे. नवीन इमारत बांधकामासह या संस्थेस इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर 30 वर्षे नाममात्र दराने देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने उपसूचनेद्वारे मान्यता दिली.