डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयातील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
738

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्रात तंबाखू विरोधी दिनानिमित्त रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी अगद तंत्र विभागाच्या वतीने तंबाखू, वीडी, गुटखा तसेच व्यसनाधीन व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महत्वाचे म्हणजे यावेळी व्यसनमुक्तीसाठी विशेष ओपीडी (OPD) चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सल्लागार डॉ. बी पी पांडे, प्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. सुनीला देव तसेच डॉ. परवेज यांनी व्यसनांचे दुष्परिणामबद्दल माहिती दिली. यावेळी अगद तंत्र विभागाचे डॉ. आरती शिंदे, डॉ. दीपक थोरात, डॉ. शुभांगी करंजे, तसेच उपाधिक्षिका डॉ. स्वाती जाधव, रजिस्ट्रार पी. वाय. पाटील, दिलीप मोहिते, रुग्ण, शिक्षक आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसचालन डॉ. चिन्मय तेंडूलकर यांनी केले तर डॉ. संतोष कदम यांनी आभार मानले.