डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर दरम्यान मोफत रोग निदान शिबीराचे आयोजन

0
530

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी येथील संत तुकारानगरमधील डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय आणि संशोधन केंद्रामध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर या एक महिन्याच्या कालावधीत मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सर्व प्रकारच्या निदानावर मोफत तपासणी करून सुरूवातीचे तीन दिवस मोफत उपचार देण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी ४ च्या दरम्यान होणार आहे. या शिबीरामध्ये संविधात, आमवात, पक्षाघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे, पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा, बाल पक्षाघात, पोटदुखी, जंन्तांना त्रास, लहाण मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन वाढणे, भूक न लागणे, शय्यामूत्रता, व्यंधत्व चिकित्सा, प्रसुती पूर्व तपासणी, सौदर्यापचार, ह्रदयरोग, पोटाचे विकार, पित्ताशयातील खडे, मुळव्याध, भगंदर, फिशर, हर्नियाष अपेंडिस, हायड्रोसिल, मुतखडा, शरीरावरील लहान मोठ्या गाठी, डोळे, कान, नाक घसा आदी रोगांचे निदान करून त्याच्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

नागरिकांमधील आढळलेल्या आजारावर तीन दिवसांची औषधे मोफत देवून चिकित्सा झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आंतरुग्ण विभागात मोफत राहण्याची आणि जेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन आयुर्वेद रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे.