डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0
504

पुणे, दि.१८ (पीसीबी) – डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी अल्‍पसंख्‍यांक विकास विभागाकडील शासन निर्णय क्र.अविवि- २०१०/प्र.क्र.१५२/१०/का.६, दि.११ ऑक्‍टोबर २०१३ मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे प्रस्‍ताव तयार करुन जिल्‍हाधिकारी कार्यालय, विशेष कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, पुणे शहर, अ इमारत, २ रा मजला, पुणे स्‍टेशन, येथे दिनांक ३१ ऑगस्‍ट २०१९ पर्यंत प्रस्‍ताव सादर करावेत.

त्‍यानंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्‍यावी, असे निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हास्‍तरीय समिती सदस्‍य सचिव डॉ.जयश्री कटारे यांनी प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.