डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी कन्हैय्या कुमारविरोधात गुन्हा

0
508

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पाटणा येथील एम्सच्या डॉक्टरांना मारहाण आणि असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्हैय्या कुमार आपल्या समर्थकांसह ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे नेता सुशील कुमार यांची भेट घेण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. यावेळी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश देण्यास मज्जाव केला. त्यावेळी कन्हैय्याच्या सहकाऱ्यांनी सुरक्षारक्षकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच डॉक्टर आणि नर्सेससोबतही त्यांनी असभ्य वर्तन  केल्याचा आरोप ठेवला आहे.

दरम्यान, एम्समध्ये उपचारांसाठी भरती असलेल्या सुशील कुमार यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. याउलट केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या समर्थकांवर त्यांनी आरोप केला आहे. काही भाजप समर्थक डॉक्टरांनी एम्समध्ये सुरू असलेले माझे उपचार बंद करण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.