डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहाची अदलाबदल

0
332

ठाणे, दि. ८ (पीसीबी) – कोरोनाच्या निमित्ताने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शिवसेना आणि राज्य सरकार यांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मृतदेहांची हेळसांड, उपचारातील गलथानपणा, निकृष्ट सेवा, जेवण खरेदितील भ्रष्टाचार असे असंख्य मुद्दे सोमय्या यांनी लावून धरले आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत आरोग्य यंत्रणांच्या कामाचं जसं कौतुक होत आहे, तसंच काही ठिकाणी होणाऱ्या बेजबाबदारपणामुळे टीकाही होत आहे. ठाण्यात आरोग्य यंत्रणांवर असाच एक गंभीर आरोप झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाण्याच्या कोविड रुग्णालयातून बेपत्ता कोविड रुग्ण प्रकरणी मोठा खुलासा केलाय. संबंधित रुग्णाचा 3 दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारातून हा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला त्यांचा रुग्ण म्हणून देण्यात आला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

ठाण्यातील बाळकुंम येथील ग्लोबल हब ठाणे कोविड रुग्णालयातून बेपत्ता झालेले भालचंद्र गायकवाड यांचा 3 दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृतदेह सोनावणे कुटुंबियांना दिला गेला होता. तसेच सोनावणे यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केल्याचं उघडकीस आलं आहे. दुसरीकडे सोनावणे कुटुंबीयांच्या रुग्णावर डॉक्टर मोरे या नावाने उपचार करत आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या आणि डावखरे यांनी केली.

मृत रुग्ण पारदर्शीपणे दिसणे गरजेचे आहे. त्या त्या नातेवाईकांना आपल्या रुग्णाची ओळख पटेल या हेतूने सरकारच्या गाईडलाईन आहेत. त्या पाळल्या जात नाही, असंही मत खासदार किरिट सोमय्या यांनी व्यक्त केलं. यापूर्वी सोमय्या आणि डावखरे यांनी दुपारीच नातेवाईकांसोबत जाऊन कासार वडवली पोलिसांकडे बेपत्ता रुग्ण प्रकरणी तक्रार दाखल केली